Jump to content

अशोक कामटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
InternetArchiveBot (चर्चा | योगदान)द्वारा ०१:०७, १८ जुलै २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
अशोक कामटे

अशोक कामटे (मधील व्यक्ती)
जन्म: २३ फेब्रुवारी इ.स. १९६५
महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २७, २००८
चौपाटी , मुंबई
पुरस्कार: अशोक चक्र(२००९)
धर्म: हिंदू
वडील: मारुतीराव


अशोक कामटे (फेब्रुवारी २३, इ.स. १९६५ - नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई) हे मुंबईचे अ‍ॅडिशनल पोलिस कमिशनर होते. त्यांचा जन्म एका मराठा कुटुंबात २३ फेब्रुवारी, १९६५ रोजी झाला.त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज येथे झाले. पुढे ५ वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग सन मधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते १९८२ मध्ये उत्तीर्ण झाले.

त्यांनी १९८५मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली .त्यांनी त्यांचे पद्विउत्तर शिक्षण सेंट स्तीफंस महाविद्यालयातून १९८७ साली पूर्ण केले.त्यांनी भारताचे पेरू मध्ये झालेल्या junior power lifting championship मध्ये प्रतिनिधित्व केले. अशोक कामते यांना पत्नी विनिता पासून दोन मुले राहुल व अर्जुन झाली. त्यांचे वडील एम.आर. कामटे भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी होते.

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला[संपादन]

नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कामटे यांनी वीरमरण पत्करले. २००९ मध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सममानीत करण्यात आले. सोलापूर मधील दादागिरी नेत्यांना न झुगरता तसेच सर्व सोलापूर मधील दंगे बंद केल्यामुळे तत्यांनी निर्भीड पोलिस अधिकारी अशी उपमा प्राप्त केली होते.

बाह्य दुवे[संपादन]


http://en.wikipedia.org/wiki/Ashok_Kamtehttp://en.wikipedia.org/wiki/Ashok_Kamtehttp://en.wikipedia.org/wiki/Ashok_Kamte