अपमान आणि छळवणूक

विहगावलोकन

मार्च 2024


आपण इतरांचा अपमान करून किंवा छळवणूक करून त्यांना लक्ष्यित करू शकत नाही किंवा इतर लोकांना तसे करण्यास प्रोत्साहित करू शकत नाही.

मनात येणारे विचार आणि माहिती तयार करून ती शेअर करण्याची, तसेच कोणत्याही अडथळ्यांशिवाय स्वतःचे विचार व्यक्त करण्याची क्षमता प्रत्येकाला देणे हा X चा उद्देश आहे. मुक्त अभिव्यक्ती हा मानवी अधिकार आहे - प्रत्येकाला स्वतःचे विचार असून ते व्यक्त करण्याच्या अधिकार आहे असा आमचा विश्वास आहे. भिन्न दृष्टीकोनांचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे अशा सार्वजनिक चर्चा लोकांपर्यंत पोहोचविणे ही आमची भूमिका आहे. 

आम्हाला हे समजले आहे की जर कोणीही, पार्श्वभूमीची पर्वा न करता, X वर छळवणूक अनुभवले, तर ते स्वतःला व्यक्त करण्याची क्षमतेला धोक्यात आणू शकते आणि हानी पोहोचवू शकते. प्लॅटफॉर्मवर निकोप संवादाची सोय करण्यासाठी तसेच लोकांना त्यांची वेगवेगळी मते तसेच धार्मिक दृष्टिकोन व्यक्त करता यावे यासाठी, इतरांना त्रास देणाऱ्या किंवा इतरांसाठी लज्जास्पद किंवा त्यांची मानहानी करणाऱ्या वर्तनास आणि सामग्रीस आम्ही प्रतिबंध करतो. लोकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करण्याव्यतिरिक्त, अश्या प्रकाराची वर्तणूक देखील बाधित व्यक्तींना शारीरिक आणि भावनिक त्रास देऊ शकते.


या धोरणाचे उल्लंघन करणे म्हणजे काय?

आम्ही खाली परिभाषित केल्याप्रमाणे इतरांना त्रास देणारी, लाज आणणारी किंवा मानहानी करणारी वर्तणूक आणि सामग्री प्रतिबंधित करतो. कृपया लक्षात घ्या की आमच्या टीमला संदर्भ समजण्यास मदत होण्याच्या दृष्टीने, काही वेळा अंमलबजावणी कारवाई करण्यापूर्वी आवश्यक माहिती आमच्याकडे असल्याची खात्री करण्यासाठी आम्हाला थेट लक्ष्यित व्यक्तीकडून जाणून घेणे आवश्यक असते.


लक्ष्यित छळवणूक

आम्ही दुर्भावनापूर्ण, अनपेक्षित लक्ष्यीकरणला (जसे की उल्लेख करणे किंवा टॅग करणे) प्रतिबंधित करतो, विशेषतः जेव्हा एखाद्यास अपमानित किंवा अवमानित करण्यासाठी सामायिक केले जाते. याचा अर्थ असा होऊ शकतो:

 • एकाद्या व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी अल्प कालावधीत अनेक पोस्ट्स शेअर करणे किंवा सतत दुर्भावनापूर्ण सामग्रीसह प्रत्युत्तरे पोस्ट करणे. यामध्ये वैयक्तिक किंवा एकाधिक व्यक्तींना त्रास देणाऱ्या खात्यांचा समावेश आहे.

 • दुर्भावनापूर्ण सामग्रीसह उपभोक्त्याचा उल्लेख करणे किंवा टॅग करणे.


हिंसक घटना नाकारणे

जिथे आम्ही घटना घडल्याचे सत्यापित केलेले असते आणि अपमानास्पद मजकूर शेअर केला जातो अशावेळी आम्ही सामुहिक खून किंवा इतर मोठ्या प्रमाणावर घडलेल्या दुर्घटनांना नकार देणारा मजकूर आम्ही प्रतिबंधित करतो. यामध्ये "फसवणूक" यासारख्या घटनांच्या संदर्भांचा समावेश असू शकतो किंवा पीडित किंवा जीवित राहिलेले हे बनावट किंवा "अभिनेते" आहोत असा दावा करू शकतात. यामध्ये होलोकॉस्ट, शाळेमधील गोळीबार, दहशतवादी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या घटना समविष्ट आहेत, परंतु त्यापुरते मर्यादित नाही:


छळणूक करण्यास प्रवृत्त करणे

जे इतरांना अपमानास्पद वर्तणूक देणारी विशिष्ट व्यक्ती किंवा लोकांच्या समूहाला त्रास देण्यासाठी किंवा लक्ष्यित करण्यास प्रोत्साहित करते आम्ही अशा वर्तनला प्रतिबंधित करतो. यात समाविष्ट आहे, परंतु ते मर्यादित नाही: ऑनलाइन गैरवर्तन करून किंवा छळणूक करून लोकांना लक्ष्य करणारे कॉल्स आणि शारीरिक छळवणूक सारख्या ऑफलाइन क्रियेसाठी उद्युक्त करणारे वर्तन.


अवांछित लैंगिक सामग्री आणि ग्राफिक ऑब्जेक्टिफिकेशन

X वर काही प्रमाणातील सहमतीयुक्त नग्नता आणि प्रौढ सामग्रीस मान्यता आहे अवांछित लैंगिक सामग्री आणि एखाद्या व्यक्तीला त्यांच्या संमतीशिवाय लैंगिकदृष्ट्या बनविणारी ग्राफिक ऑब्जेक्टिफिकेशन सारख्या गोष्टींना आम्ही बंदी घालतो. यामध्ये खालील घटक समाविष्ट आहेत, परंतु त्यापुरते मर्यादित नाही:

 • कोणालाही अवांछित आणि/किंवा नको असलेला प्रौढांसाठीचा मीडिया पाठविणे (प्रतिमा, व्हिडिओज आणि GIFs) 

 • एखाद्याच्या शरीराची अवांछित लैंगिक चर्चा करणे 

 • लैंगिक कृत्यांचा आग्रह

 • एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय अन्य कोणताही मजकूर ज्यावरून अन्यथा एखाद्या व्यक्तीचे लैंगिकत्व वाढवते. 


अपमान

इतरांना लक्ष्य करण्यासाठी अपमान किंवा अपशब्द वापरण्याविरोधात आम्ही कारवाई करतो. तथापि, काही व्यक्तींना काही विशिष्ट शब्द आक्षेपार्ह वाटू शकतात, परंतु ज्या ठिकाणी अपमानास्पद शब्द वापरले जातात त्या प्रत्येक केसविरूद्ध आम्ही कारवाई करणार नाही. 


पूर्वीची नावे आणि सर्वनामांचा वापर

जिथे स्थानिक कायद्याची आवश्यकता असेल, आम्ही अशा पोस्ट्सची दृश्यमानता कमी करू ज्या एखादी व्यक्ती स्वतःसाठी सर्वनामे वापरते त्याऐवजी इतर कोणाला संबोधण्यासाठी भिन्न सर्वनामे वापरते, किंवा तो पूर्वीचे नाव वापरते जे कोणी त्यांच्या संक्रमणाचा भाग म्हणून वापरत नाही. असे उल्लंघन झाले आहे की नाही हे निर्धारित करण्याची जटिलता लक्षात घेता, उल्लंघन झाले आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी आम्ही नेहमी लक्षित व्यक्तीकडून ऐकले पाहिजे.


या धोरणाचे उल्लंघन करणे यामध्ये काय नाही?

वैयक्तिक स्तरावर पाहिल्यास, काही पोस्ट्स हानिकारक वाटू शकतात, परंतु जेव्हा मोठ्या चर्चेमधील मागचा पुढचा संदर्भ घेऊन ती पाहिली जातात तेव्हा ती तशी वाटत नाहीत. उदाहरणार्थ, मित्र एकमेकांशी संवाद साधण्यासाठी काही शब्द किंवा वाक्यांश एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी वापरू शकतात जे संदर्भ नसतील तर अपमानास्पद वाटू शकतात. आम्हाला माहीत आहे की आमच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग इतरांच्या हानिकारक वर्तनाकडे लक्ष वेधण्यासाठी, त्यांचा निषेध करण्यासाठी किंवा त्यांना हायलाइट करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये, जेव्हा संदर्भ स्पष्टपणे गैरवर्तन करणारा नसतो आणि अशा प्रकारच्या वक्तृत्वाचा प्रतिकार करण्याचा हेतू असेल तेथे आम्ही कारवाई करत नाही.

संस्था, पद्धती आणि विचारांवर टीका करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक मूलभूत भाग आहे आणि म्हणूनच आम्ही अशा प्रकारच्या गंभीर टिप्पण्यांवर कारवाई करणार नाही.


या धोरणाच्या उल्लंघनाचा कोण रिपोर्ट करू शकते?

आमच्या समर्पित रिपोर्ट फ्लोचा वापर करून कोणीही या धोरणाचे उल्लंघन करू शकते. तथापि, काही वेळा अंमलबजावणी करण्यापूर्वी आवश्यक माहिती आमच्याकडे असल्याची खात्री करण्यासाठी आम्हाला थेट लक्ष्यित व्यक्तीकडून जाणून घेणे आवश्यक असते.


आपण या धोरणाचे उल्लंघन केल्यास काय घडते?

या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड निश्चित करताना, आम्ही उल्लंघनाच्या तीव्रतेसह अनेक घटकांचा विचार करतो परंतु इतकेच मर्यादित नाही, एखाद्या व्यक्तीला लक्ष्य केले गेले आहे का (जसे की उल्लेख करणे, पूर्ण नावाने संदर्भित करणे, फोटोसह संदर्भित करणे इ.) आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या व्यक्तीचा मागील रेकॉर्ड आहे का. या धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या मजकुराच्या संभाव्य अंमलबजावणी पर्यायांची यादी खालीलप्रमाणे आहे:

 • X वर सामग्री कमी दृश्यमान करणे:

  • शोध परिणाम, उत्पादनातील शिफारसी, ट्रेंड, सूचनापत्रे आणि होम टाइमलाइनमधून पोस्ट्स काढून टाकणे 

  • पोस्टची शोधक्षमता लेखकाच्या प्रोफाइलवर मर्यादित करणे

  • प्रत्युत्तरांमध्ये पोस्टची रॅकिंग कमी करणे

  • लाइक्स, प्रत्युत्तरे, पुन्हा पोस्ट करणे, पोस्ट विषयी भाष्य करणे, बुकमार्क, शेअर करणे, प्रोफाइलवर पिन करणे, सहभाग संख्या किंवा एन्गेजमेंट संख्या हे सर्व प्रतिबंधित करणे 

  • पोस्टला लागून असलेल्या जाहिराती वगळून

 • ई-मेलमध्ये किंवा उत्पादनाच्या शिफारसींमधील पोस्ट्स आणि/किंवा खाती वगळणे. 

 • पोस्ट काढून टाकण्याची आवश्यकता दर्शविणे.

  • उदाहरणार्थ, आम्ही एखाद्यास पुन्हा पोस्ट करण्यापूर्वी उल्लंघन करणारा मजकूर काढून टाकून रीड-ओन्ली मोडमध्ये काही काळ ठेवण्यास सांगू शकतो. त्यानंतरच्या उल्लंघनामुळे खाते निलंबित केले जाऊ शकते.

 • ज्याचा एकमेव उद्देश, अवांछित लैंगिक सामग्री आणि ग्राफिक ऑब्जेक्टिफिकेशन धोरणांचे, उल्लंघन करणे आहे किंवा वैयक्तिक व्यक्तीला त्रास देणे आहे अश्या खात्यांचा समावेश असणारी खाती स्थगित करणे.

अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या अंमलबजावणीच्या पर्यायांची व्याप्ती पहा, आणि जर एखाद्याला असे वाटत असेल की त्यांचे खात्यावर चुकून अंमलबजावणी करण्यात आली आहे, तर ते अपील सबमीट करू शकतात.

हा लेख शेअर करा